अवकाळी तसेच गारपिटीने पिकांचे नुकसान, साडे सात हजार हेक्टर क्षेत्र बाधित : Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात वादळी वारे तसेच गारपिटीने नुकसान झाले आहे. एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 7 हजार 841 हेक्टर वरील क्षेत्र ( प्राथमिक अंदाज ) हे बाधित झाले आहे. अशी माहिती कृषी विभागाने वर्तवली असून या नुकसान क्षेत्राचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे
Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra
या गारपिटीने काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात सोसाट्याचा वारा तसेच मोठ्या प्रमाणावर गारपीट यामुळे आपल्या बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अनेक बळीराजाचा गहू हा कापणीच्या आला असून तर काही बळीराजाचा गहू खळ्यात येऊन पडला आहे. तसेच काहीचा कांदा काढणीला आला आहे त्याचबरोबर टरबूज, द्राणक्षे, टोमॅटो या अवकाळी पावसाने बाधित झाले आहे.
Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra
सध्या जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे तो कधी संपणार हे माहीत नाही पण अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या बाबत संशय व्यक्त केला जात आहे.
कोठे किती नुकसान ?
( प्राथमिक अंदाज )
तालुका – क्षेत्र ( हेक्टर मध्ये )
श्रीरामपूर – 3975 हेक्टर
नगर – 1687
राहता – 850
संगमनेर – 357
पाथर्डी – 330
नेवासा – 310
राहुरी – 210
जामखेड – 65
कोपरगाव – 57
Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra 2023 Rabbi
संपात असूनही पंचनामासाठी बांधावर !
अहमदनगर जिल्ह्या सोबत इतर जिल्ह्यात सध्या शासकीय कर्मचारी यांचा संप चालू आहे. पण संपत असूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी अधिकारी, तलाठी हे शेतकऱ्यांच्या बांदा वर जाऊन नुकसानीचे पंचनामे करीत आहे.
Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra 2023 Rabbi