मोठी घोषणा, जूनपासून मुलींना उच्च शिक्षण मिळणार मोफत free higher education in maharashtra for girl’s

नमस्कार, मुलींचे शिक्षण संदर्भात नुकतेच अनेक घोषणा आल्या आहेत. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठी घोषणा केली. ती नक्कीच फायदेशीर आणि वरदान ठरणार आहे.

जूनपासून मुलींना उच्च शिक्षण मिळणार मोफत

पहिल्यांदा अशी शिक्षणाची सोय फकट ओबीसी मुलींना होती पण ती फक्त 50 % फी वर होती पण नुकतीच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठी घोषणा केली. आता जून पासून उच्च शिक्षणात जवळ जवळ 600 अभ्यासक्रमात मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये इंजिनियरिंग आणि मेडिकल चा सुध्दा समावेश आहे.

उच्च शिक्षण मंत्री यांनी उत्तर महाराष्ट्र मध्ये कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात एका कार्यक्रमा दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी ही मोठी घोषणा केली. तुम्हाला माहीतच आहे शिक्षण घेणे खूप अवघड झाले आहे. त्यात इंजिनियरिंग आणि मेडिकल मध्ये असणारा लाखो रुपये खर्च. त्यामुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्यास खूप अडचणी निर्माण झाले होते. आता मुली या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता आणि याची जी फी असणार आहे ती महाराष्ट्र सरकारं भरणार आहे.

मुलींना उच्च शिक्षण मोफत घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत ?

१) मुलगी ही महाराष्ट्र रहिवासी असली पाहिजे.

२) उच्च शिक्षणात फी मोफत असणार आहे, १२ वी पर्यंत शिक्षण तसेही मोफत आहे.

३) मुलीच्या पालकांचे उत्पन्न हे 8 लाखा पेक्षा कमी पाहिजे.

👇👇👇👇👇👇👇

aapla Baliraja

Leave a Comment