2 मे ला लागणार उन्हाळी सुट्टी ; 15 जूनला शाळा उघडणार पण विदर्भात मात्र 1 जुलैला सुरू होणार, पहा

maharashtraa school acedamic year will start from 15th June : मित्रांनो, महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्यातील शाळांच्या सुट्ट्याच्या नियोजनाची घोषणा काल दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी केली. नवीन वर्षातील शालेय वर्ष हे 15 जून पासून सुरू होणार आहे ( विदर्भ वगळता ). मराठी शाळांना 2 मे उन्हाळी सुट्टी चालू होणार आहे. विदर्भामध्ये शाळा मात्र हे 01 जुलै पासून चालू होणार आहे.

विदर्भामध्ये 01 जुलैपासून शाळा सुरू होण्याचे कारण तेथील तापमान आहे. किती तापमानाचा विचार करूनच या शाळा एक जुलैपासूनच विदर्भात सुरू होणार आहे. विदर्भ हा महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग आहे. या विभागांमध्ये दोन प्रमुख विभाग येतात एक नागपूर दुसऱ्या मध्ये अमरावती. यामध्ये बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यामध्ये नवीन वर्षाला शाळा ( 2024-25 ) या 01 जुलैपासून सुरू होणार आहे.

aapla Baliraja

Leave a Comment