शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा मधून होतेय लूट, मूळ शेतकरी अंधारातच ! Pik Vima Mafia found in Crop Insurance Maharashtra

 शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा मधून होतेय लूट, मूळ शेतकरी अंधारातच !



Crop Insurance Mafia Maharashtra 



Pik vima mafia maharashtra found crop insurance
Pik vima mafia maharashtra crop insurance



 



Crop Insurance Mafia Maharashtra 

 

शेतकऱ्यांच्या नावाखाली पीक विमा अनुदान लाटणार्या विमा माफिया याचा पर्दाफाश झाल्यानंतर असे प्रकार जळगाव सह कोल्हापूर, सांगली,पुणे,औरंगाबाद,जालना, कोल्हापुर  अश्या जिल्ह्यात सुद्धा उघड झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने चौकशी सुरू केली आहे. राज्यात तपासणी केलेले ऐकून शेतकरी हे 30,982 ( आतापर्यंत ) यामध्ये अयोग्य शेतकरी 2,274 आहेत आणि खरे शेतकरी यामध्ये 28,708 एवढे आहेत.





Crop Insurance Maharashtra 

जो मुख्य किंवा मूळ शेतकरी आहे यात अंधारात ठेवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान या पीक विमा माफिया ( जे शेतकरी नाहीत ) यांनी लाटले आहे.



जळगाव जिल्ह्यात तपासणी केली असता येथे काही शेतकऱ्यांच्या शेतात केळी पीक नसतानाही पीक विमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची तपासणी केली असता शेतकऱ्यांच्या नावाखाली भलतेच लोक या पीक विमाचे अनुदान प्राप्त करून घेत आहेत. आता कृषी विभागाने चौकशी सुरू केल्यामुळे सर्वांचीच खळबळ उडाली आहे.








यावर्षी खरीप हंगामात जवजवळ 2 लाख 48 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या सोबत जवजवळ 30 हजार 982 शेतकर्यांनी  प्रत्यक्ष पीक पाहणी केली आहे. कृषी विभागाच्या वेबसाईट वरून कोणालाही पीक विमा काढता येतो. त्यासाठी सातबारा उतारा व आधार कार्ड ची गरज असते.याचाच फायदा हे विमा माफिया वाले घेतात. हे माफिया विमा उतरविण्याच्या शेवटच्या दिवशी विमा न काढलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने विमा काढतात.






Crop Insurance Maharashtra 

महत्वाचे म्हणजे हमखास अनुदान प्राप्त होत असल्याने कुठल्या पिकाचा विमा काढायचा हे त्यांना चांगलेच माहीत असते. यातून ते अनुदान प्राप्त करतात कारण त्यांना माहीत असते की या पिकाचे अनुदान येणार आहे.असे हे विमा माफिया वाले स्वतःची शेती नसतानाही असे विमा काढून अनुदान प्राप्त करतात या कृषी विभागाच्या चौकशी तून  स्पष्ट झाले आहे.





पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एका गावात जवळजवळ 70 शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचे विमा काढल्याचे संकेतस्थळावर दिसते. मात्र प्रत्यक्ष पाहणीत केवळ तीनच शेतकऱ्यांकडे डाळिंब पीक असल्याचे स्पष्ट झाले आहे.






पंधरा लाख अनुदानातून लाटले :-

सांगली जिल्हयात जत तालुक्यात एक शेतकऱ्याने लिंबू पीक विमा काढला होता. प्रत्यक्ष पाहणीत त्या शेतात सोयाबीन हे पीक होते. तपासणीत पाहिले असता ज्या शेतकऱ्याने विमा काढला त्या व्यक्तीच्या नावावर शेतजमीन नव्हती तो सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातील असल्याचे सिद्ध झाले.




 



गेल्या वर्षी या व्यक्तीने अनुदानापोटी 1 लाख 20 हजार कमावले अजून चौकशी केली असता त्याच्या संपूर्ण कुटुंबाने पीक विमा काढल्याचे आढळले. त्यातून त्याने गेल्या वर्षी 15 लाख कमवले होते. 



तर अश्या पीक विमा माफियाचे जाळे जळगाव सह सोलापूर तसेच अहमदनगर, धुळे, नागपूर, नाशिक,सोलापूर,औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर , सांगली तसेच नागपूर असल्याचे विविध चौकशीत सिद्ध झाले आहे








aapla Baliraja

Leave a Comment