शरद पवार गट लोकसभा उमेदवार नावाची पहिली यादी जाहीर यादी जाहीर, यादी पहा ! Loksabha Umedvar Sharad Pawar Gat

पक्ष फुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी लोकसभा 2019 यासाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केलेली आहे. पहिल्या यादीत अनेक दिग्गज नेते आहेत . पहिल्या यादीमध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे यांचे नाव जाहीर केले आहे. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघामधून डॉक्टर अमोल कोल्हे यांचे नाव पुढे आले आहे. या लोकसभा उमेदवार नावाची यादी ही राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) यामध्ये प्रवेश केलेले अमर काळे आणि निलेश लंके यांनासुद्धा या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये संधी देण्यात आलेली आहे. महायुतीकडून अहमदनगर दक्षिण साठी डॉक्टर सुजय विखे यांचे नाव जाहीर केल्यानंतर महाआघाडी कडून निलेश लंके यांचे नाव पुढे करण्यात आलेले आहे.

लोकसभा 2024 या निवडणुकीसाठी स्वतः निलेश लंके मैदानात उतरले आहेत. त्यांनी पारनेर विधानसभा आमदारकीचा राजीनामा देऊन ते स्वतः लोकसभा 2024 ची निवडणूक लढवणार आहेत. नगर दक्षिण मध्ये आता महायुती कडून डॉक्टर सुजय विखे आणि महाविकास आघाडी करून निलेश लंके हे उमेदवार असणार आहे.

aapla Baliraja

Leave a Comment